Monthly Archives: June 2010
‘हरियाली’ महायज्ञ २५जूनपासून
|
||||||||||||||||
महाबीजारोपणाचा घेतला वसा म. टा. वृत्तसेवा ठ्ठ नाशिक ठाण्यापासून ते धुळ्यादरम्यानच्या महामार्गालगत असलेल्या वनक्षेत्रात ‘हरियाली’ संस्थेने हाती घेतलेल्या ‘रुजवाई’ या महाबीजारोपणाच्या उपक्रमाला २५ जूनपासून सुरुवात होणार आहे. शहरातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहरातील विविध संस्थांसह कंपन्यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. हायवेलगतची शहरे, गावे, वस्त्यांमधील रहिवासी, तसेच निसर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था, संघटना, क्लब, शाळा, कॉलेजातील विद्याथीर्, कर्मचारी, लहानमोठे उद्योग समूह, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्याथीर्, वनसमित्या अशा सर्वसमावेशक सहभागातून हे अभियान व्यापक स्तरावर राबविले जाणार आहे. यासंदर्भातील नाशिक शहरासाठीची बैठक बुधवारी वनविभागाच्या सभागृहात झाली. त्यात बीजारोपण अभियानाचे नियोजन करण्यात आले. नाशिकलगतची निर्धारित क्षेत्र निश्चिती १९ जून रोजी होणार असून, प्रत्यक्षात बीजारोपण मोहीम २५ ते २७ जून या तीन दिवसांत राबविली जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. शहरातील संक्रमण, आयएमए संस्था, तसेच महिंदा अॅण्ड महिंदा कंपनी आदींचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मोहीमेंतर्गत हायवेलगत असलेल्या वनक्षेत्राचाच वापर केला जाणार आहे. कारण हायवेच्या जागेचा वापर त्यासाठी करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या अभियानासाठी वनविभागाने संमती दिली असून, निसर्गप्रेमींचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. वनविभाग व पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यात गिरिपुष्प, कडुलिंब, कांचन, रेन-ट्री, चिंच, मोह, करंज व बहावा अशा अनेकविध देशी झाडांच्या बिया उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. वड व पिंपळाचीही लागवड केली जाणार आहे. केवळ पर्यावरण दिनानिमित्त केवळ दिखाऊ कार्यक्रम हाती न घेता, आपण निसर्गाचे काही देणे लागतो, या भावनेतून प्रत्येकाने ‘थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली अॅण्ड अॅक्ट लोकली’ या त्रिसूत्रीने काम करण्याची वेळ आली आहे, असे सांगत अधिकाधिक निसर्गप्रेमींनी यात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. शहापूर, कसारा, नाशिक, चांदवड व धुळ्यानजीक मोठ्या प्रमाणावर वनविभागाची जमीन असल्याने, त्या ठिकाणी बीजारोपणाची संधी आहे. शहरालगतच्या रायगडनगर, पांडवलेणी व अंबड एमआयडीसी भागात ही मोहीम राबविली जाणार आहे. अधिक माहिती व सहभागासाठी संपर्क : (०२५३) २३५०६३१ अथवा ९८६०५९३०००. |
” Meeting of prospective participants in Maha Beejaropan Abhiyan”
Dear Friends
1.Nature of the event and Location of the Activity:
Sowing of assorted species of trees on the land that may be available on both sides of the newly widened National Highway No. 3, i.e, Mumbai-Agra Road on its 350 k.m. length from Thane-Shahapur-Kasara-Igatpuri-Nashik-Chandwad-Malegaon to Dhule with a special concentration on the forest land adjoining/near the Highway. As such, there would be special concentration of the activity at Laling near Dhule, Chandwad and Kasara-Shahpur section. Respective areas are marked on a map which would be posted on the Web Site shortly
Chandwad-Igatpuri Section: Saturday, 26th June;
People wanting to participate in this event on this section are requested to contact any of them for additional info.
5. Meeting of prospective participants: A meeting of members of Hariyali and all those who would like to participate in this event is convened for additional briefing on Sunday, 6thJune 2010 at 4.00 p.m. at Bhagavati High School, Vishnunagar, Naupada, Thane 400602. The project would be highlighted with a Power Point Presentation. A number of other events are also lined up for the entire monsoon and are posted on the Web Site. A P.P. Presentation will also be made a the forthcoming meeting on the “Changing Face of Bhavale”.
All are requested to attend positively.
President, Hariyali