Seed Sowing – Plantation Near Chandni Chowk, Pune

Seed sowing – plantation to be held at Chandni Chowk, Pune on Saturday, 30th June 2012. हरियालीने येत्या शनिवारी, ३० जुन,२०१२ रोजी चांदणी चौकाजवळच्या टेकडीवर बीजारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

कार्यक्रम स्थळ: चांदणी चौकाजवळच्या टेकडीवर
एकत्र जमण्याचे ठिकाण : पौड रस्त्यावरील टोल नाक्याजवळ . टोल नाक्याच्या अलीकडे सुमारे ३०० फुट. पुण्याच्या बाजूने उजव्या हाताला एक होटेल आणि डाव्या हाताला वन खात्याची पत्र्याची शेड. टोल नाका क्रॉस करू नये . हरीयालीचा सभासद तेथे हजर असेल .
वेळ : सकाळी ७.२० वाजता . ७.३० ला टेकडीवर जाण्यास सुरुवात होईल .वन खात्याच्या शेडच्या मागे मोठा इलेक्ट्रिक टौवर आहे. त्याच टेकडीवर जावयाचे आहे.
काम : प्रत्येकाला बियांची पाकिटे ( यात सुमारे ५०ते १०० निरनिराळ्या बिया असतील ) + आंब्याच्या कोयी देण्यात येतील . यांचेच बीजारोपण करावयाचे आहे.
वेष : टेकडीवर( सुमारे पर्वतीच्या उंचीची) चढण्यास योग्य असावा. स्पोर्ट्स शूज , पावसाची  टोपी,छत्री, विंडचीटर, आवश्यक वाटत असल्यास पाणी ( बाटली)
कालमर्यादा : सुमारे ३ तासात कार्यक्रम संपेल .
वयोगट : ४ वर्षावरील कोणीही मुले/मुली/अन्य नागरिक
नोंदणी : फी नाही. येणाऱ्या  व्यक्तींनी  हरीयालीच्या नोंदणी पुस्तकात आपले नाव ,पत्ता,फोन आणि इ-मेल आयडी कृपया द्यावा. याचा उपयोग पुढील फेरीसाठी होईल .

आपण एक समाजकार्य म्हणुन येणार आहात . काही तृटी असल्यास निदर्शनास आणाव्यात .

हरियाली संबंधी माहितीसाठी hariyalithane.com  याला भेट द्या.

आता शनिवारी सकाळी भेटू.

अ.द.ओक, हरियाली, संस्थापक सदस्य आणि विश्वस्त,
९८२२४७५५६० (पुणे)

1 thought on “Seed Sowing – Plantation Near Chandni Chowk, Pune

  1. All the best for this first project that you have taken up. Do send in all the photos!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *