चला रुजवायला आंब्याच्या कोयी!

चला रुजवायला आंब्याच्या कोयी! Bookmark and Share Print E-mail
ठाणे/प्रतिनिधी
आंब्याच्या कोयी फेकून न देता त्या धुऊन स्वच्छ करून सावलीतच वाळवून जमा करण्याचे आवाहन हरियालीतर्फे काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. नागरिकांनी त्याला भरघोस प्रतिसाद देत अशा कोयी गोळा करून ठेवल्या आहेत, तशाच त्या हरियालीकडेदेखील जमा करण्यात आल्या आहेत.
अशा सर्व कोयींचा रुजवा हरियालीतर्फे भवाळे-लेणाड परिसरातील वनजमिनीवर रविवार, ३० मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्यात येणार आहे. या वनजमीन रा.म.पा.क्र.३ (मुंबई-नाशिक महामार्ग) पासून पांजरापोळ ते पिसे धरणाच्या रस्त्यालगत भवाळे-लेणाड या गावाच्या परिसरात आहे. हे ठिकाण ठाण्यापासून सुमारे २५ कि.मी., कल्याणपासून आठ कि.मी आणि भिवंडीपासून सुमारे १० कि.मी.वर आहे. हरियालीतर्फे या डोंगरावर गेले दोन पावसाळे जनसहभागातून मोठय़ा प्रमाणावर वृक्षलागवड आणि जलसंवर्धनाचे काम चालू असून, एकेकाळी उघडय़ा-बोडक्या झालेल्या या डोंगराचे स्वरूप आमूलाग्रपणे बदलायला सुरुवात झाली आहे.
ज्यांना या क्रांतिकारी उपक्रमात सामील होण्याची इच्छा असेल अथवा आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ कोयी रुजवून आम्रवृक्ष लावण्याचे पुण्यकर्म करण्याची इच्छा असेल, त्या सर्वांनी आपली नावे गोविंद चव्हाण (९८१९१२८५१४) अथवा अजित देशबंधू (९८६९०२३७९४) अथवा अ‍ॅड. सुरेखा पाटील (९३२२६४८६२४) यांच्याकडे नोंदवावीत,असे आवाहन ‘हरियाली’ चे अध्यक्ष पुनम सिंगवी यांनी केले आहे.

6 thoughts on “चला रुजवायला आंब्याच्या कोयी!

 1. This is very good work for nature conservation we also participate in this movement

 2. I read the article on Hariyali and I am extremely pleased with the work that Hariyali is doing in the field of Environment preservation and protection and enhancement.

  Keep it up and may you get all the support from the public in general and co-operations from corporate groups

 3. hello ,i am really impressed with the work that hariyali is doing for environment protection from many years we would like to join with hariyali for this good cause with our NSS valuanters

 4. Hello Sunita,

  There is Calander for activities for the next 4 months on the site.

  Do refer to them and then contact undersigned on 9869023794

 5. आंब्याच्या कोयी सुकवून त्याचे झाड होण्यास कीती वर्षे लागतील. त्यापेक्षा तयार कलम लवकर व हमखास वाढेल असे वाटते. आपण यावर काय उद्बोधन कराल. तसेच कडुनिंबाच्या बिया या कावळ्याच्या विष्ठेतून पडलेल्या असतीलच तरच त्याचे झाड रूजते खरे की खोटे.

 6. Regret we did not rely you earlier.

  You are most welcome to join us.

  Do visit our web site regularly and see the Calanders for the Activities!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *